भडंगा येथील डेमो अंगणवाडीत वेलकम मेळावा उत्साहात संपन्न

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
गोरेगाव, 
anganwadi-welcome-gathering : महिला व बाल विकास विभाग आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या नवचेतना व आधारशिला बालमनाशी उपक्रमांतर्गत तालुक्यातील भडंगा येथील डेमो अंगणवाडी क्रमांक 3 येथे गुरुवारी 23 जुलै रोजी वेलकम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
 
anganwadi-welcome-gathering
 
 
 
यावेळी नव्याने अंगणवाडीत दाखल झालेल्या बालकांचे व त्यांच्या पालकांचे आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले. तसेच पालकांना अंगणवाडीतील शैक्षणिक, पोषण, आरोग्य व पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या सेवांची माहिती देण्यात आली. नियमित उपस्थितीचे महत्त्व, बालकांच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका आणि घर व अंगणवाडी यांच्यातील समन्वय याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अतुल मोटघरे होते. उद्घाटन जि. प. सभापती डॉ. लक्ष्मण भाऊ भगत यांनी केले. प्रसंगी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक जितेंद्र कोटांगले, बाल विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकला मेंढे आणि मुंडीपार बीटमधील सर्व अंगणवाडी सेविका यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवचेतना व आधारशिला बालमनाशी उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत अंगणवाडीतील गुणवत्तापूर्ण पूर्वप्राथमिक शिक्षण, पालकांचा सक्रिय सहभाग आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडीची भूमिका यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला पालक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी बालकांच्या स्वागतासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.