नागपूर,
Binzani Women's College श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयाचा ६५ वा स्थापना दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या 'दीपकळी' या वार्षिकांकाच्या ६५ व्या अंकाचे प्रकाशन व परीक्षण, संस्थेच्या पहिल्या गौरवगीताचे लोकार्पण, विद्यार्थिनी उत्कर्ष मंडळाची स्थापना तसेच एलुमनाय असोसिएशनतर्फे १५ विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींनी *'दीपकळी'*च्या दर्जेदार संपादनाचे कौतुक करत विद्यार्थिनींवर होत असलेल्या संस्कारांचे अभिनंदन केले. संगीत विभागाच्या प्रमुख प्रा. दीपश्री यांच्या शब्दबद्ध व संगीतबद्ध गौरवगीताचेही यावेळी लोकार्पण झाले. विद्यार्थिनींना बॅज, प्रमाणपत्रे व पुरस्कार प्रदान करण्यात आले.हेरिटेज दर्जा प्राप्त महाविद्यालयाच्या या सोहळ्याला व्यवस्थापन, प्राध्यापक, विद्यार्थिनी तसेच मान्यवरांची उपस्थिती लाभली. शिक्षणाबरोबर संस्कार व व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य देणाऱ्या महाविद्यालयाच्या कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले.
सौजन्य:चंद्रशेखर क्षीरसागर ,संपर्क मित्र