देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त 25 दात्यांनी केले रक्तदान

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
कुरखेडा, 
blood-donation : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अभियान राबविण्यात येत असून या अनुषंगाने तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे आणि सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेडीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा तालुका कुरखेडा यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय, येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
 
 
 
jh
 
 
 
या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांच्यासह 25 दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. विशेष म्हणजे भाजपा महिला पदाधिकार्‍यांनीही रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अनिल गिरणारे तसेच त्यांच्या सहकारी अधिकार्‍यांनी रक्तदान केले. रक्तदान करणार्‍यांमध्ये भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, जिल्हा सचिव रूपाली कावळे, राकेश चौहान, श्रीकांत नागीलवार, धनंजय नाकाडे, मंगेश दखणे, रितेश माखिजा, चेतन गाहणे, नितेश लांजेवार आदींचा समावेश होता.
 
 
 
यशस्वितेसाठी रवींद्र गोटेफोडे, शहराध्यक्ष न.प. सभापती सागर निरंकारी, प्रा. विनोद नागपूरकर आणि डॉ. जगदीश बोरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.