मंगरूळनाथ,
devendra fadnavis महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल १०५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श सिद्ध केला.
रक्ताची गरज कोणत्याही क्षणी कोणालाही भासू शकते. अपघात, मोठ्या शस्त्रक्रिया, प्रसूती, थॅलेसेमिया,कर्करोग, रक्ताची कमतरता, आणि विविध गंभीर आजारांवरील उपचारांसाठी रक्ताचा प्रत्येक थेंब अमूल्य ठरतो. हीच जाणीव मनात ठेवून युवक, महिला,सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी झाले. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे मंगरूळनाथ शहराध्यक्ष अभिषेक दंडे यांनी स्वतः ३१ वे रक्तदान करून कार्यकर्त्यांसमोर आदर्श निर्माण केला. रक्तदान हेच श्रेष्ठ दानया विचाराला कृतीत उतरवत युवकांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाला आ.श्याम खोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, शहराध्यक्ष अभिषेक दंडे, जेष्ठ नेते सुरेश लुंगे, नगरसेवक गणेश खोडे, नंदलाल पवार, श्रीहरी इंगोले, एकनाथ कड, संतोष उगले तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करून समाज हितासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. गटनेते गणेश खोडे यांनी याप्रसंगी रक्तदान करून आपली समाज सेवा सिद्ध केली.आजच्या धावपळीच्या जीवनात रक्ताचा तुटवडा ही गंभीर समस्या बनत आहे.या वेळी स्वेच्छेने रक्तदान करणारे रक्तदाते हे अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण ठरतात. एका रक्तदात्यामुळे तीन ते चार रुग्णांना जीवनदान मिळू शकते ही जाणीव समाजात सेवाभाव, सामाजिक उत्तरदायित्व व मानवतेचा संदेश देणारी ठरली. हा उपक्रम मंगरूळनाथ शहराच्या सामाजिक जाणीवेचे प्रतीक ठरला. रक्तदानाच्या माध्यमातून उपस्थितांनी रक्तदान जीवनदान हा संदेश घराघरात पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.