मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ छत्र्यांचे वाटप

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Devendra Fadnavis महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त प्रतापनगर चौक येथे गरजू मजूर बांधवांना ५६ छत्र्यांचे वाटप करण्यात आले. प्रभाग ३६च्या नगरसेविका माया हाडे यांच्या नेतृत्वाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
 

not 
 
 
पावसात रोजगाराच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या श्रमिकांना संरक्षण मिळावे, या उद्देशाने छत्र्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला वंदना शर्मा, शिवानी दाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संजय देशमुख, श्रुती देशपांडे, अरविंद हाडे, निलेश टावरी, सुनील भुसे, डॉ. सुषमा गुम्बळे, पल्लवी भालेराव, रामा कठाले, अरुंधती रंभाड, मनीष छाबलानी, करुणा करांजकर, नितीन वाघ, पैठणकर व शुभांगी अंधारे यांनी सहकार्य केले.
सौजन्य : माया हाडे,संपर्क मित्र