समाजभवन समाजाच्या उन्नतीचे माध्यम : आमदार डॉ. धर्मरावबाबा

(मुस्लिम समाजाच्या विविध विकासात्मक कामांचे लोकार्पण)

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
अहेरी, 
dharmaraobaba-atram : समाजभवन हे समाज उन्नतीचे व विकासाचे उत्तम माध्यम असून समाज भवनात समाज विकासाचे जडणघडण घडत असते, असे प्रतिपादन आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. ते सोमवारी, 23 जलै रोजी अल्पसंख्यक बहुल नागरी क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत समाज भवन, ईदगाह संरक्षण भिंत, टिन शेड व सिमेंट रोडचे लोकार्पण सोहळ्यात उदघाटक म्हणून मार्गदर्शन करत होते.
 
 
 
j
 
 
 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्रबाबा आत्राम होते. व्यासीठावर प्रमुख अतिथी म्हणून हर्षवर्धनरावबाबा आत्राम, दिलदार सैय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीकांत मद्दीवार, राजेश्‍वर रांगुलवार, इरफान पठाण, इसाक भाई, शफीक शेख, रफिक भाई आदी उपस्थित होते.
 
 
आमदार डॉ. आत्राम म्हणाले की, समाजाचा विकास व्हावा हेच माझे ध्येय असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी माझी धडपड असून नेहमी विधायक कार्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे आवर्जून सांगितले. यावेळी फित कापून समाजभवनाचे व इतर कामांचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक रियाज शेख यांनी, तर संचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले.