मुंबई, ठाणे, रायगडसह पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
मुंबई,
five districts orange alert महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर पकडला असून मुंबईसह कोकणातील अनेक भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई, उपनगरे, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असून रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईची लोकल सेवा सुरू असली तरी काही मार्गांवर गाड्या धीम्या गतीने धावत आहेत.
 

five districts orange alert 
 
 
दरम्यान, राज्यातील पावसाचे चित्र मात्र सर्वत्र सारखे नाही. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असताना विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील तीन तास मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांतील काही भागांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानाची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत ताशी सुमारे ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.five districts orange alert यासोबतच काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, अत्यावश्यक नसल्यास प्रवास टाळावा आणि प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यंदाच्या मान्सून हंगामात राज्यात अद्यापही सरासरीपेक्षा सुमारे २१ टक्के कमी पाऊस झाल्याचे हवामान विभागाच्या निरीक्षणातून समोर आले आहे. पुढील काही दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली, तरी या भागांमध्ये अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी पावसाची तूट असे विरोधाभासी चित्र पाहायला मिळत आहे.