माजी जिप सदस्य रेणू शिंदे शिवसेनेत

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
renu-shinde : माजी जिल्हा परिषद सदस्य रेणू संजय शिंदे व सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ मानकर यांनी मुंबई येथील बाळासाहेब भवन येथे शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मृदू व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश करण्यात आला.
 
 
 
y23July-Renu
 
 
 
उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव मोरे, शिवसेना उपनेते आनंद जाधव, पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख पराग पिंगळे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीधर मोहोड, हरिहर लिंगनवार, संजय शिंदे, जिल्हाप्रमुख राजुदास जाधव, गजानन डोमाळे, मामा काटे, हबीब पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
 
 
हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या विचारधारेनुसार शिवसेनेची वाटचाल सुरू असून रेणू शिंदे व सिद्धार्थ मानकर यांच्या प्रवेशामुळे यवतमाळ तालुक्यात शिवसेना संघटनेला नवीन ऊर्जा व बळ मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.