आरोग्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर चार जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
देहरादून
uttarakhand health minister उत्तराखंडचे आरोग्यमंत्री सुबोध उनियाल यांच्या निवासस्थानाबाहेर नर्सिंग भरतीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या चार सदस्यांनी फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या नर्सिंग एकता मंचच्या आंदोलनाला बुधवारी अचानक धक्कादायक वळण मिळाले.
 

uttarakhand health minister 
आत्महत्येचा प्रयत्न करणारे चारही जण नर्सिंग एकता मंच संघटनेचे सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. नर्सिंग भरती प्रक्रिया पारंपारिक लेखी परीक्षेऐवजी ज्येष्ठतेच्या आधारे राबवावी, ही या आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे.या मागण्यांसंदर्भात नर्सिंग एकता मंचच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्री सुबोध उनियाल यांची भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र, ही बैठक निष्फळ ठरल्यानंतर आंदोलक आक्रमक झाले. माहितीनुसार, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्र्यांसमोर आपल्या मागण्या मांडल्या; मात्र त्या थेट फेटाळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.“आम्ही आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन आमच्या रास्त मागण्या मांडल्या, परंतु त्यांनी आमच्या मागण्या थेट फेटाळून लावल्या आणि आम्हाला तेथून निघून जाण्यास सांगितले,” असे कुकरेती यांनी सांगितले.
मागण्या मान्य न झाल्याने निराश झालेल्या चार सहकाऱ्यांनी मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर फिनाईल प्राशन केल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यापैकी एका आंदोलकाची प्रकृती बिघडल्याने त्यांना दून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेनंतर पोलिसांनी नर्सिंग एकता मंचचे अध्यक्ष नवल पुंडीर यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर पुन्हा आंदोलनस्थळी सोडले. दरम्यान, आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.“घटनेनंतर पोलिसांनी मला आणि इतर अनेक आंदोलकांना ताब्यात घेऊन पुन्हा आंदोलनस्थळी सोडले. आम्ही पुन्हा आरोग्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू करणार आहोत