स्वातंत्र्यसैनिक बंकटलाल भुतडा ट्रस्टचा सामाजिक उपक्रम

57 हजार शेतकरी व शेतमजुरांना दोन लाखांचा अपघाती विमा

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
social-initiative : स्वातंत्र्य सैनिक बंकटलाल भुतडा ट्रस्ट, उमरखेड यांच्या सौजन्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त 57 हजार अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचा मोफत अपघाती विमा उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वाकांक्षी सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ राजस्थान भवन, उमरखेड येथे उत्साहात झाला. या उपक्रमांतर्गत प्रतिनिधिक स्वरूपात शेतकरी व शेतमजुरांना विमा करारपत्रांचे वितरण करण्यात आले.
 
 
 
y23July-Bankatlal
 
 
 
कार्यक्रमात जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी, स्वातंत्र्य सैनिक बंकटलाल भुतडा ट्रस्टच्या माध्यमातून समाजहिताचा उद्देश ठेवून हा उपक्रम राबवित आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस केवळ औपचारिक न साजरा करता संपूर्ण महिनाभर अधिकाधिक शेतकरी व शेतमजुरांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
 
 
यावेळी त्यांनी शेतकèयांना पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक शेतीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. शासनाच्या विविध योजनांचा अभ्यास करून त्यांचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या भागातील शेतकरी प्रगत, सक्षम व आत्मनिर्भर झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.
 
 
 
प्रास्ताविकात सर्व बँकांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त शेतकरी व शेतमजुरांचा अपघाती विमा काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार किसन वानखेडे, माजी आमदार विजय खडसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णा देवसरकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सुदर्शन रावते, विविध बँकांचे व्यवस्थापक, जगदीश नरवाडे, रमेश चव्हाण, तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.
 
 
यावेळी प्रतिनिधिक स्वरूपात दोन शेतकरी व शेतमजुरांनी मनोगत व्यक्त करून या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल स्वातंत्र्य सैनिक बंकटलाल भुतडा ट्रस्ट व आयोजकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संचालन गजानन शिंदे यांनी केले. या उपक्रमामुळे हजारो शेतकरी व शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा कवच मिळणार असून, वाढदिवसाचे औचित्य साधून समाजहिताचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.