नागपूर,
Government schools in rural areas ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे, अपुऱ्या सुविधा, डिजिटल साधनांचा अभाव आणि शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागाच्या पीएच.डी. संशोधन विद्यार्थिनी अश्विनी सागर खापर्डे यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० आणि समग्र शिक्षा अभियानासारख्या योजना प्रभावीपणे वर्गखोलीपर्यंत पोहोचणे गरजेचे असून, दर्जेदार शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे. सरकारी शाळांना आवश्यक मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ उपलब्ध करून दिल्यास शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
सौजन्य:अशोक माटे,संपर्क मित्र