नागपूर,
Health Camp, G-5 Chemist, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त नागपूर महानगरात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य निदान व औषध वितरण शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शेकडो रुग्णांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.
या शिबिरांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांसह हुडकेश्वर-नरसाळा परिसरातील जी-५ केमिस्टचे खाजगी औषध विक्रेतेही निःस्वार्थपणे सेवा देत आहेत. या माध्यमातून गरजू रुग्णांना औषधोपचाराची मदत उपलब्ध करून देण्यात येत असून, अशी सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जी-५ केमिस्टतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शासन आणि प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.
सौजन्य:अमोल बोन्द्रे,संपर्क मित्र