पाऊस, वादळ अन् ६० किमी वेगाचे वारे; १४ राज्यांना अलर्ट!

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
india-weather-forecast : देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनचा प्रभाव वेगाने वाढत असून हवामान खात्याने २४ जुलै रोजी विविध भागांत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे. उत्तर भारतातील दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
 
rain
 
 
डोंगराळ राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे आणि ढगफुटीसारख्या दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याने स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मैदानी प्रदेशातही पावसाची शक्यता
राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि बिहारच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये २४ जुलै रोजी मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. यामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असून कमाल तापमानात घट होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. बिहारमध्ये काही ठिकाणी विजा पडण्याचा धोका असल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत मान्सूनचा हा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे.