जनसंग्राम फाउंडेशनकडून ५६ वृक्षांचे रोपण

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Jan Sangram Foundation महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त जनसंग्राम फाउंडेशनतर्फे ५६ वृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
 
  
 
ravi4
 
 कार्यक्रमाला जनसंग्राम फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. परिणीता फुके, सचिव रवि वाघमारे, नगरसेवक योगेश पाचपोर, नगरसेविका रुतिका मसराम, वर्षा चौधरी, वॉर्ड अध्यक्ष विठ्ठल चोपडे, जयश्री राठोड, बबिता धुर्वे, कमलेश बिमलवार, धनंजय पेशने, मधू गुप्ता, बबली फरकांडे, कविता पांडे, राजहंस यांच्यासह नागरिक उपस्थित होते.यावेळी जनसंग्राम फाउंडेशनतर्फे आगामी काळात विविध वैद्यकीय, सामाजिक, प्रबोधनपर व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
सौजन्य:रवि वाघमारे,संपर्क मित्र
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात फळवाटप
नागपूर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उमरेड मार्गावरील पंचवटी वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना फळांचे वाटप करण्यात आले. सेवाभाव जोपासण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
 
anshu
 
यावेळी नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, भाजप नागपूर शहर महिला अध्यक्षा व जलप्रदाय समिती सभापती दिव्या धुरडे, परिवहन समिती सभापती मंगला खेकरे, भाजप नागपूर शहर मंत्री तथा माजी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
सौजन्य: अंशुल जिचकार,संपर्क मित्र