मोहतातील लिफ्ट बंदच; विध्यार्थ्यांना उचलून नेण्याची वेळ

वांदिले यांचे मुख्याधिकार्यांना निवेदन

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
हिंगणघाट,
gbm mohata college नगर परिषदद्वारे संचालित स्थानिक जी.बी.एम. मोहता महाविद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी बसविण्यात आलेली लिफ्ट उद्घाटनानंतर आजपर्यंत सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लिफ्ट सुरू करून विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी राकाँ (शप) गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी केली आहे.
 
 
gbm mohata college
 
 
महाविद्यालयातील अकरावी विज्ञान शाखेचा दिव्यांग विद्यार्थी हिमांशू मनोहर वंजारी याचा वर्ग वरच्या मजल्यावर आहे. शाळेतील लिफ्ट बंद असल्याने त्याच्या वडिलांना दररोज त्याला उचलून वर्गात न्यावे लागत आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली सुविधा प्रत्यक्षात वापरात नसल्याने संबंधित विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबाला मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येबाबत संबंधित अधिकारी, प्राचार्य तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकार्यांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा आरोप अतुल वांदिले यांनी केला आहे.gbm mohata college त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने लिफ्ट चालू करावी, अशी मागणी केली आहे..
दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाचा समान अधिकार मिळावा आणि त्यांना सन्मानाने शिक्षण घेता यावे यासाठी महाविद्यालयातील लिफ्ट तात्काळ सुरू करणे आवश्यक आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास राकाँ (शप) गटाच्या वतीने विद्यार्थी, पालक व नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वांदिले यांनी दिला आहे.