अमरावती,
mephedrone-seized : गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर छापा टाकून ४२ लाख ८० हजाराचे २१४ ग्रॅम एम.डी. ड्रग्ससह आरोपीस गुरूवारी रात्री ताब्यात घेतले.

पोलिसांना माहिती मिळाली होती कि, लाल रंगाच्या एमएच ४० सीए २१९१ क्रमांकाच्या चारचाकी गाडीत एक व्यक्ती बसून एम.डी. नावाचा अमलीपदार्थ विक्री करीता ताजनगर परिसरात येणार आहे. पोलिसांनी त्या आधारावर पो.स्टे. नागपुरीगेट हद्दीत पाटीपुरा येथे छापा टाकला. सईद खान शरीफ खान (वय ४१ वर्ष, रा. पाटीपुरा) याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतल्यावर २१४ ग्रॅम मेफेड्रान नावाचा अमलीपदार्थ त्याच्याकडे मिळून आला. सदर अंमलीपदार्थ हा विक्रीकरीता बाळगत असल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी एमडी जप्त करून आरोपीला कारसह ताब्यात घेतले. जप्त एमडीची किमत ४२ लाख ८० हजार आहे. ८ लाखाची कार, १५ हजाराचा मोबाईल असा एकूण ५० लाख ९९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई पो.नि. दिनेश दहातोंडे, पो.नि. अतुल वर, सपोनि. मनीष वाकोडे, सपोनि दशरथ आडे, सहा. पोउपनि फिरोज खान, मंगेश लोखंडे, रंजित गावंडे, सुरज चव्हाण, निखील गेडाम, सागर ठाकरे यांनी केली.