श्री हव्याप्रमंच्या अभियांत्रिकीला ‘स्वायत्त’ दर्जा

यूजीसीची अधिकृत मान्यता

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
अमरावती, 
official-ugc-recognition : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळद्वारा संचालित कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ’स्वायत्त’ दर्जा प्रदान केला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील ही अभिमानास्पद आणि ऐतिहासिक उपलब्धी मानली जात असून, यामागे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सहकार्य आणि सकारात्मक भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे.
 
 
j
 
या महाविद्यालयाने स्वायत्त दर्जासाठी सादर केलेला प्रस्ताव संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने शिफारस केल्यानंतर दहा वर्षांच्या कालावधीकरिता स्वायत्त दर्जा प्रदान करण्यास मंजुरी देण्यात आली. यासंदर्भातील पत्र यूजीसीकडून विद्यापीठाला प्राप्त झाले आहे. स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्यामुळे महाविद्यालयाला अभ्यासक्रम रचना, मूल्यांकन पद्धती, उद्योगाभिमुख शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विविध नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविता येणार आहेत. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, आधुनिक अभ्यासक्रम आणि रोजगाराभिमुख संधी उपलब्ध करून देण्यासाठी या दर्जाचा मोठा लाभ होणार आहे.
 
 
महाविद्यालयाच्या या यशाबद्दल हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मशी प्रभाकरराव वैद्य, कार्याध्यक्ष प्रशांत देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. माधुरी चेंडके, कोषाध्यक्ष प्राचार्य श्रीनिवास देशपांडे, सचिव प्रा. विकास कोळेश्वर, सचिव प्रा. रवींद्र खांडेकर, प्रा. दीपा कान्हेगावकर यांनी अमरावती विद्यापीठाचे आभार तर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. एस. डाळू व सर्व प्राध्यापक तसेच कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.