बुलडाणा,
ayush-service-facilitation-centre : आयुषमंत्री कार्यालयाच्यावतीने पंढरपूर येथे भक्तांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध ठिकाणावर आयुष सेवा सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष मंत्रालयाची सेवा ग्रामीण भागतील जनतेला मिळावी तसेच ग्रामीण भागातही आयुर्वेदाचा प्रचार प्रसार व्हावा , प्राचीन भारतीय आयुर्वेदीक उपचार पद्धतीचा लाभ वारकरीर्यांना मिळावा दृष्टीकोनातून केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र प्रभार ) तथा आरोग्य व कुंटुब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून आयुष मंत्रालयाच्या वतीने विठ्ठुरायाच्या चरणी आयुष सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला होता .

त्यानुसार राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत आयुष सेवा सुविधा केंद्र आषाढीवारी निमित्य २४ ते २६ जुलै या कालावधीसाठी उभारण्यात आले आहेत . पंढरपुरात तिन रस्ता येथे महाआरोग्य शिबीर , चंद्रभागेच्यातिरी आरोग्य केंद्र वाळवंट आणि आरोग्य केंद्र ६५ एक्कर या तिन ठिकाणावर आयुवैदीक , होमिओपॅथी औषध वाटप , योगाबाबत मार्गदर्शन , स्नेहन स्वेदन (वाफ देणे ) वारकर्यांसाठी तेल मसाज , विद्ध कर्म , अग्नी - कर्म , चरण सेवा , खएउ प्रदर्शन ठेवण्यात आले आहे आयुष वैद्यकीय अधिकारी ,वैद्यकीय महाविद्यालयतील तसेच सोलापूर जिल्हयातील २८ आयुर्वेद , होमीओपॅथी महाविद्यालयचे डॉटर, प्राध्यापक आणि इंटर्नस आरोग्य सेवा देण्यासाठी सहकार्य करणार आहे तर नेचरफिट संस्थेतर्फे औषध वाटप करण्यात येणार आहे आज २३ जुलै रोजी . पंढरपुर येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ भगवान पवार आयुष मंत्रालयातर्फे नियुक्त नोडल अधिकारी चंद्रकांत काटकर युवराज वाघ , जिल्हाशल्य चिकीत्सक डॉ वर्षा डोईफोडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतिष कोपुरवाड अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नंदकिशोर घाडगे, आयुष नोडल अधिकारी डॉ हर्षल जाधव यांच्या समावेत बैठक झाली त्यांनंतर सेवा सुविधा केंद्रावर जावुन व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.