सशक्त युवकांमधूनच समर्थ राष्ट्र घडेल

-प्रशांत दाणी यांचे प्रतिपादन -रा. स्व. संघाचे शताब्दी युवा संमेलन उत्साहात

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पारवा, 
prashant-dani : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करत आहे. हा केवळ एका संघटनेचा उत्सव नसून, संपूर्ण देशाला परम वैभवाकडे नेण्याचा संकल्प आहे. आजच्या घडीला देशाला अशा तरुणांची गरज आहे जे शारीरिक, मानसिक व बौद्धिकदृष्ट्या सक्षम असतील. सशक्त युवकांच्या बळावरच आपण एका समर्थ व विश्वगुरू राष्ट्राची निर्मिती करू शकतो. खंडातील प्रत्येक तरुणाने आपल्या दैनंदिन जीवनात राष्ट्रवादाचा विचार रुजवून संघ कार्यात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ प्रांत शारीरिक प्रमुख प्रशांत दाणी यांनी केले.
 
 
 
y23July-Prashant
 
 
 
ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून घाटंजी खंडातर्फे आयोजित शताब्दी युवा संमेलनात बोलत होते. श्री संत गजानन महाराज मंदिर सभागृह, घाटंजी येथे आयोजित संमेलनात पारवा, घाटंजी शहर व परिसरातील शेकडो युवकांनी उपस्थिती लावली होती.
 
 
युवा संमेलनाला मुख्य मार्गदर्शक म्हणून विदर्भ प्रांत शारीरिक प्रमुख प्रशांत दाणी उपस्थित होते. व्यासपीठावर प्रामुख्याने घाटंजी तालुका संघचालक भरत तायडे व प्रमुख अतिथी म्हणून प्रवीण वानखेडे उपस्थित होते.
यावेळी विविध खेळांचे व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले.