प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नाने पुरात अडकलेल्या ४० जणांचे वाचले प्राण

*जानेफळ ता. मेहकर येथील पडधरीया कुटुंबातील तिघांचे प्राण वाचले

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
बुलडाणा, 
prataprao-jadhav : पुरात अडकलेली गाडी शोधून हेलिकॉप्टरच्या मदतीने ४० जणांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी केंद्रीय आयुषमंत्र्यांच्या टिमने सतर्कता दर्शविल्याबद्दल पडधरिया कुटुंबाने आभार मानले आहे. आयुषमंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांना माहिती दिली दिल्लीवरून स्वीय सहाय्यक राहुल सोळंकी गोपाल डिके यांनी संबंधित विभागाला कळविले तत्काळ मदत कार्याला सुरुवात झाली पुरात अडकलेली गाडी शोधून हेलिकॉप्टर द्वारे मदतीने ४० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले यामध्ये जानेफळ येथील तिघांचे प्राण वाचल्याने पढधरीया कुटुंबाने नामदार प्रतापराव जाधव यांचे आभार मानले आणि सुटकेचा श्वास सोडला.
 
 
njh
 
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुयातील जानेफळ येथे पडधरीया हे कुटुंब मिठाईचे व्यवसाय गुजराज येथे राहतात तर हितेश पडधरिया याचा मुलगा जीत हा गुजरात मध्ये वापी जिल्हा वलसाड येथे इंजिनियर आहे त्याला भेटण्यासाठी हितेश दलिचंद पडधरीया ५३ वर्ष मानसी एस खिलेशिया वय २८ वर्ष आणि मानसी ची चिमुकली धिविजा वय तीन वर्ष हे काल वापी वरून नाशिक जालना ट्रॅव्हल्स ने येत असतांना वापीपासून अंदाजे पंचवीस किलोमीटर असलेल्या आंबेठी कोरली नजीक नदीचे पाणी रस्त्यावरून वाहत असतांना पाणी अचानक वाढले काही मिनिटातच ट्रॅव्हल्स बुडू लागली यातील प्रवाशी ट्रॅव्हलच्या टपावर जाऊन बसले चोहीकडे पाणीच पाणी दिसू लागले अन जीव वाचविन्या साठी नातेवाईकांना फोन करू लागले डोळ्यात मरण दिसत असताना हितेश यांनी जानेफळ येथील राजूभाई पडधरिया यांना कळविले.