बुलढाणा
priyanka chittaranjan rathi संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या फार्मास्युटिकल सायन्सेस विषयातील आचार्य (पीएच.डी.)पदवी साठी संशोधक प्रियंका चित्तरंजन राठी यांचा संशोधन प्रबंध मान्य करण्यात आला असून त्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली आहे.
प्रियंका चित्तरंजन राठी,बुलढाणा यांनी हे संशोधन कार्य अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी, चिखली येथील संशोधन केंद्रात पूर्ण केले.या संशोधन कार्यासाठी त्यांना प्राचार्य डॉ कैलास आर. बियाणी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संशोधनाच्या अंतिम टप्प्यातील कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी डॉ अविनाश टेकाडे ,प्राचार्य, चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेज लातूर यांनी बाह्यपरीक्षक म्हणून उपस्थित राहून संशोधन प्रबंधाचे परीक्षण केले.
प्रियंका राठी यांनी आपल्या संशोधनाची उद्दिष्टे,संशोधन पद्धती,निष्कर्ष आणि साहित्यिक योगदान यांचे सुस्पष्ट व प्रभावी सादरीकरण केले.उपस्थित प्राध्यापक,संशोधक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी आत्मविश्वासाने आणि समर्पक उत्तरे दिली. आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल प्रियंका राठी शैक्षणिक,साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.आपल्या यशाचे श्रेय त्यांनी मार्गदर्शक प्राचार्य डॉ.कैलास आर. बियाणी,आचार्य कक्ष संगाबाविअ यांच्या सह कुटुंबिय,मित्र व इतर प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष सहकार्य करणार्या सर्वांना दिले आहे. या उल्लेखनीय शैक्षणिक यशामुळे चिखली व बुलढाणा परिसरासह फार्मास्युटिकल सायन्स क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून डॉ. प्रियंका चित्तरंजन राठी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.