अबॅकस स्पर्धेत भूमी जयस्वाल द्वितीय

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
नागपूर ,
Sevasadan Primary School सेवासदन शिक्षण संस्था संचालित सेवासदन प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी भूमी जयस्वाल हिने नुकत्याच झालेल्या अबॅकस स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच तिच्या विशेष बुद्धिमत्तेबद्दल तिलाही विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.

bal 
 
 
भूमीच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या यशात पालक, शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षा उके, पालक संचालिकासाधना हिंगवे यांचे मार्गदर्शन लाभले. सेवासदन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी, सचिव वासंती भागवत तसेच उपाध्यक्ष श्री बापू भागवत यांनी भूमीचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सौजन्य : बाळकृष्ण सुरतने,संपर्क मित्र