कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा जण जखमी

भिलखेडा मंदिरामागील वस्तीत भीतीचे वातावरण

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
कारंजा लाड,
dog attack शहरातील मूर्तिजापूर मार्गावरील हनुमान मंदिर परिसरातील भिलखेडा मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या वस्तीत गुरुवारी सकाळी ७ ते ९ वाजण्याच्या दरम्यान चार ते पाच भटया कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत सहा नागरिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात सहा जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
six injured in stray dog attack at bhilkheda temple area in karanja lad
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून या भागात भटया कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सकाळी फिरायला जाणारे नागरिक, शाळेत जाणारी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच भिलखेडा मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक यांना या कुत्र्यांमुळे सतत धोका निर्माण झाला आहे. गुरुवारी झालेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही भटया कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने या परिसरातील भटया कुत्र्यांना पकडून योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
 
वेळेत उपाययोजना न केल्यास एखाद्या लहान मुलाचा किंवा ज्येष्ठ नागरिकाचा जीव धोयात येऊ शकतो. त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडण्यापूर्वी नगरपरिषद प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने भटया कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन जखमी नागरिकांना आवश्यक वैद्यकीय मदत मिळेल याची काळजी घ्यावी आणि परिसरातील भटया कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.