कर्ज, नापिकी व विजेच्या प्रतीक्षेत संपले आणखी एक आयुष्य

दोन मुलांनंतर आता वडिलांनीही केली आत्महत्या

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
suicide-case : यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसतानाच राळेगाव तालुक्यातील पिंपळापूर येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. सततची नापिकी, वाढते कर्ज व शेतीसाठी आवश्यक वीजजोडणी न मिळाल्याने नैराश्यात गेलेल्या ज्ञानेश्वर मालेकर (वय 62) यांनी बुधवारी पहाटे 5 च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.
 
 
y23July-Dnyaneshwar-Malekar
 
 
 
या प्रकारामुळे शेतकरी कुटुंबांवरील वाढत्या आर्थिक संकटाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्राप्त माहितीनुसार, ज्ञानेश्वर मालेकर यांनी आपल्या 5 एकर शेतीसाठी लाखो रुपयांचा खर्च करून बोअरवेल खोदली होती. शेतीला पाणी मिळावे म्हणून त्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून वीजजोडणीसाठी आवश्यक डिमांडही भरली होती. मात्र दीर्घकाळ उलटूनही त्यांना वीजपुरवठा मिळाला नाही. दुसरीकडे सततची नापिकी, वाढते कर्ज व आर्थिक विवंचनेमुळे त्यांची मानसिक अवस्था खालावत गेली.
 
 
दोन वर्षांपूर्वी याच कुटुंबातील दोन्ही मुलांनीही कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्या दुहेरी आघातातून कुटुंब अजून सावरले नव्हते. आता वडिलांनीही आत्महत्या केल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 
 
ज्ञानेश्वर मालेकर यांच्यामागे पत्नी व मोठा परिवार आहे. ग्रामस्थांनी शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मृत शेतकèयाच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत द्यावी, तसेच वीजजोडणीसह शेतकèयांच्या प्रलंबित प्रश्नांवर त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.