‘वंचित’च्या नेतृत्वात यवतमाळात कडकडीत बंद

विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराचा निषेध

    दिनांक :23-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
total-shutdown-in-yavatmal : दिल्ली येथील जंतरमंतरवर न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाèया विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमारच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला यवतमाळ शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ नगर पालिका गटनेते नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात या बंदचे नियोजन करण्यात आले. संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात हजारो नागरिक एकत्र आले असून संपूर्ण आंदोलन शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि संविधानिक पद्धतीने पार पडले.
 
 
y23July-Niraj
 
या बंदमध्ये शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, खाजगी शाळा, ऑटो-रिक्षा चालक-मालक, स्कूल बस चालक तसेच विविध व्यवसायींनी सहभाग नोंदविला. परिणामी शहरातील जनजीवन काही काळासाठी ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
 
 
 
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना वंचितचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी देशातील सद्यस्थितीवर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व लोकप्रतिनिधींवर टीका केली. बेरोजगारी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.
 
 
त्यानंतर प्रमोदिनी रामटेके, नगरसेवक जावेद अन्सारी, राजा गणवीर, सत्यजित मेंढे, हर्षदीप कांबळे, नितेश मेश्राम, तेजस थूल, उषा खंडारे, प्रा. पंढरी पाठे, ममता धारपवार, प्रफुल शंभरकर, प्रसन्नजीत भवरे, सुजाता वावरे, चित्रा घोडेस्वार, गोपाळ माकोडे, नारायण थूल यांच्यासह विविध विद्यार्थी प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विशेष दिव्यांग चिमुकले विद्यार्थी तसेच जंतरमंतर आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा जाहीर केला.
 
 
या आंदोलनाला मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे नंदकुमार बुटे, शशिकांत खडसे, चंद्रशेखर कुडूपले, शिक्षक संघटनेचे गौरीनंदन कन्नाके, जगदीश वानखडे, अशोक हेलोंडे, श्यामादादा कोलाम ब्रिगेडचे सुरेश कुमरे, वर्षा निकम, शेतकरी चळवळीचे प्रा. पंढरी पाठे, सचिन मनवर, कृष्णा पुसनाके, दलित पँथर जिल्हाध्यक्ष सचिन खाडे, जुबेर सय्यद, आम आदमी पार्टीचे मोबीन शेख, आकाश चमेडिया, सेवानिवृत्त पोलिस डोंगरे यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय व कर्मचारी संघटनांचा पाठिंबा होता.
 
 
यावेळी जिल्हाधिकाèयांमार्फत राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनातून विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमारची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा तसेच संवैधानिक अधिकारांचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली.