वर्धा,
vanchit bahujan aghadi दिल्ली येथे आंदोलन करणार्या विद्याथ्र्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला वर्धेत संमिश्र प्रतिसाद मिळाला. वर्धेसह देवळी, समुद्रपूर येथे आक्रोश मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
वंचितचे जिल्हाध्यक्ष किशोर खैरकार यांच्या नेतृत्वाखाली बजाज चौकातून निघालेल्या मोर्चात आयटक, आप, विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक, आंबेडकरी तसेच राजकीय संघटनांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने फिरत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाला सोशल निर्माण फोरमचे नीरज गुजर, भीम टायगर सेनेचे विशाल रामटेके, भारतीय बौद्ध महासभेचे विशाल मानकर, भीम आर्मी संविधान रक्षक दलचे आशिष सोनटक्के, शिवसेना उबाठाचे प्रमोद भोमले, प्रदीप कांबळे, सुनील कोल्हे, महेंद्र मुनेश्वर, आसिफ खान यांच्यासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला.
हिंगणघाट : शहरात मोर्चा काढून उपविभागीय महसूल कार्यालयावर धडक दिली. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकारी आकाश अवतारे यांना दिले. आंदोलनात विजय तामगाडगे, कुणाल वासेकर, अजय डांगरे, ललित धनविज, मयूर धाबर्डे, सुनील तेलतुंबडे, अनिल मून, प्रा. अनिल बाभले, गोरख भगत, रसपाल शेंद्रे, अनिल जवादे, अतुल वांदिले, सुनील डोंगरे, आदी सहभागी झाले होते.
देवळी : तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेत राजश्री देशमुख, शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख अनंत देशमुख, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अशोक राऊत, अर्चना मून, कृष्णकांत शेंडे, जब्बार तवर, मिलिंद दिघाडे, कुणाल कांबळे आणि गौतम पोपटकर आदींनी मनोगत व्यक्त केले. मोर्चात काँग्रेस नगरसेवक अशोक राऊत, अजय देशमुख, मिलिंद देशमुख, कृष्णकांत शेंडे, सुनील बासू, पवन महाजन, जब्बार तवर, सुरेश वैद्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
समुद्रपुरात आक्रोश मोर्चा
समुद्रपूर : येथे झालेल्या मोर्चात विविध सामाजिक, शैक्षणिक व युवक संघटनांसह शाळा-महाविद्यालयातील विद्याथ्र्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत घटनेचा निषेध व्यक्त केला. मोर्चात आकाश जयस्वाल, मधुकर कामडी, महेश झोंटीग, अशोक वांदिले, प्रमोद भटे, रुषभ राऊत यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.