नवी दिल्ली
neet exam nta ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या (एनटीए) कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत संस्थेतील ४७ अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असून, आगामी काळात आणखी काही जबाबदार घटकांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
संपूर्ण संस्थात्मक संरचनेत मोठे बदल
neet exam nta सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनटीएच्या एकूणच काम करण्याच्या पद्धतीत मुळापासून सुधारणा घडवून आणली जात आहे. केवळ अधिकारी बदलण्यापुरती ही कारवाई सीमित नसून, संपूर्ण यंत्रणेची पुनर्रचना केली जाणार आहे. परीक्षा पद्धतीमधील तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटी दूर करण्यासाठी या संस्थेचे नवे स्वरूप लवकरात लवकर समोर आणले जाईल.
बाह्य सेवांवर लगाम आणि तज्ज्ञ समितीच्या शिफारशी
neet exam nta येत्या महिनाभरात या सर्व फेरबदलांची प्रत्यक्ष अंमलबजावणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेषतः, परीक्षा आयोजनासाठी घेण्यात येणाऱ्या आउटसोर्सिंग’ सेवांच्या नियमांमध्ये कडक सुधारणा करण्यात येणार आहेत. यासाठी गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीने सुचवलेल्या उपायांच्या आधारेच ही नवी नियमावली तयार केली जात आहे.