ऑलिम्पिक हॉकीपटू अशोककुमार यांचे नागपुरात स्वागत

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
नागपूर
Ashok Kumar Dhyan Chand भारताचे माजी ऑलिम्पिक हॉकीपटू अशोककुमार ध्यानचंद यांचे शुक्रवारी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर उत्साहात स्वागत करण्यात आले.बँकर्स स्पोर्ट्स कौन्सिलच्या वार्षिक पुरस्कार समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून ते नागपुरात आले आहेत. निजामुद्दीन–बेंगळुरू राजधानी एक्स्प्रेसने फलाट क्रमांक २ वर आगमन होताच कौन्सिलचे पदाधिकारी शरद पाध्ये, रवि जोशी, रमेश ठाकूर आदींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

७ ८ ९ ०  
 
 
यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचे मानकरी संजय लोखंडे यांनी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे सुपुत्र अशोककुमार यांना मेजर ध्यानचंद यांचे रंगीत छायाचित्र तसेच 'खेल खिलाडी खेल' या ऑलिम्पिक विशेषांकाची प्रत भेट दिली.
सौजन्य:अभय चोरघडे,संपर्क मित्र