वाशीम,
sanjay-kute : निवडणुक नसतांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकर्यांसाठी ४१ हजार कोटीची कर्जमाफी केली तसेच ४८ हजार कोटींचे शेतकर्यांचे कृषी पंपाचे वीज देयक माफ केले. शेतकर्यांची अडचण बघुन त्यांनी ही कर्जमाफी व वीजमाफी केली. खर्या अर्थाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकर्यांचे कैवारी आहेत. शेतकर्यांना येणार्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. जलयुक्त शिवार योजना ही त्यापैकी एक असून, शेतीमध्ये यांत्रिकीकरण करुन शेतकर्यांना समृध्द करण्याचा त्यांचा मानस आहे. शेततकरी कर्जमुक्ती ही उपकार नव्हे तर कर्तव्य म्हणून शेतकर्यांना मदत असल्याचे आमदार संजय कुटे यांनी आज, २४ जुलै रोजी पत्रपरिषदेत केले. ते आमदार श्याम खोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये पत्रकारांना संबोधीत करीत होते.

पुढे माहिती देतांना आमदार कुटे म्हणाले की, राज्यातील ५६ लाख शेतकर्यांना ४८ हजार कोटी रुपयांचा लाभ देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ’ ही ऐतिहासीक योजना आहे. जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपयांचा लाभ मिळालेल्या शेतकर्यांसाठी या योजनेत २ लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमित परतफेड करणार्या शेतकर्यांसाठी २०२६ -२७ मध्ये कर्जाची उचल करुन वेळेत परतफेड करण्याची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. याशिवाय साडेसात अश्वशक्तीपर्यंत वीज देयक माफ केले जाणार आहे. त्यामुळे लाखो शेतकर्यांच्या थकीत वीज देयकाची पाटी पुर्णपणे कोरी होणार आहे. या निर्णयामुळे राज्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडार असला तरी कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, ही शासनाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कृषी क्षेत्रासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी सुमारे ९५ हजार कोटी खर्च केले जातात. कापसाची १३६ लाख क्विंटल खरेदी करुन १० हजार ८८३ कोटी रुपयाचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. सोयाबीनचे ६ लाख टन उत्पादन ३ हजार १९८ कोटी रपुयांना खरेदी करण्यात आले, तर कांदा खरेदीमुळे बाजाराव स्थित राहण्यास मदत झाली. दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे २०० टीएमसी पाणी वाहून जाारे पाणी वळणबंधार्याद्वारे पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात नेण्याची योजना आहे. राज्यात ५२ टक्के भाग अवर्षणप्रवण असताना दुसरीकडे अनेक भागात पावसाचे पाणी समुद्रात जाऊन वाया जाते. गोदावरील तापी खोर्यांत हे पाणी यावे यासाठी वैनगंगा, नळगंगा सारख्या नदीजोडण्या योजनांतून नद्या तयार करण्यात येत असून, वाहने जाणारे पाणी उचलले जाईल आणि सुमारे २४ टीएमसी पाणी उचलून वेगवेगळ्या माध्यमांतून उत्तर महाराष्ट आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत, असेही शेवटी आमदार संजय कुटे यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला आ. श्याम खोडे, आ. सई डहाके, भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, नगराध्यक्ष अनिल केंदळे, भाजपा शहराध्यक्ष मनीष मंत्री यांची उपस्थिती होती.