बोगस सोयबिन बियाणे : तीन कंपन्यांवर नऊ गुन्हे दाखल

-कृषी विभागाची कारवाई -यवतमाळ, दिग्रस, दारव्हा, आर्णी, बाभुळगाव, नेर, कळंबमध्ये तक्रारी

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
bogus-soybean-seed-companies : उगवण क्षमता नसणारे सोयाबीन बियाणे शेतकèयांच्या माथी मारणाèया बियाणे कंपन्यांचे पितळ उघडे पडले आहे. जिल्ह्यात 1350 पेक्षा अधिक शेतकèयांनी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या. या तक्रारींचा ओघ अजूनही वाढत आहे.
 
 

kj 
 
 
 
यामुळे कृषी विभागाची यंत्रणा सक्रिय झाली. त्यांनी बांधावर जाऊन पंचनामे करीत तीन कंपन्यांचे बियाणे नमुने तपासणीला पाठविले. यात हे बियाणे बोगस असल्याचे उघड झाले. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी व गुणनियंत्रण अधिकारी यांच्या तक्रारीवरून यवतमाळ, दिग्रस, दारव्हा, आर्णी, बाभुळगाव, कळंब, नेर येथील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले.
 
 
यवतमाळ तालुक्यात बियाणे निरीक्षण संजय पवार यांच्या तक्रारीवरून पार्श्व जेनिटिक इंडिया (बारबेटा, मध्यप्रदेश) या कंपनीविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रुई येथील शेतकरी रहेमतखां सर्फराजखां, विकार अहमद फिजर अहमद, निशांत ठाकरे, अन्सारअली जब्बारअली, रशिदा अयुब अली, अथर अहमद फिजर अहमद या शेतकèयांनी पार्श्व जेनिटिकचे सोयाबीन बियाणे पेरले होते. त्यामुळे या कंपनीचे परवानाधारक सौरभ बारबेटा यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.
 
 
यवतमाळ तालुक्यातीलच खरोला येथील शेतकरी संघशील टेंभरे, धम्मश्री टेंभरे, रुई येथील जहागीर अली, दत्ता देठे, भांबराजा येथील दिगंबर चौधरी यांनी बुस्टर प्लांट जिनेटिक्स (गेवराई, जि. जालना) या सोयाबीन बियाणाची पेरणी केली होती. ते उगवले नसल्याची तक्रार मिळाल्यानंतर बियाणे निरीक्षण प्रेमनाथ आडे यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून बियाणे कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
 
 
याच कंपनीच्या बियाणाची पेरणी दिग्रस तालुक्यातील 31 शेतकèयांनी केली होती. त्यांचेही सोयाबीन उगवले नाही. बियाणे निरीक्षक साक्षी आडे यांच्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बाभुळगाव तालुक्यातही बुस्टर जेनिटिक्सचे वियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर कृषी अधिकाèयांनी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला.
 
 
जिल्ह्यातील 2 तालुक्यांत 168 तक्रारी कृषी विभागाकडे आल्या. कळंबमध्ये 125 तक्रारींविरुद्ध गुन्हा नोंद चौकशी करून बुस्टर प्लांट जेनिटिक्स (गेवराई बाजार ता. बदनापूर) व पार्श्व जेनिटिक्स इंडियाविरुद्ध झाला. तर नेर तालुक्यात 43 तक्रारींवरून नागपूरच्या अंकुर सीडस या बियाणे कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
 
 
आर्णी व दारव्हा तालुक्यात शेतकèयांनी व्हिगोर बायोटेक (सुखलिया, मध्यप्रदेश) या कंपनीचे बियाणे पेरले होते. ते उगवले नसल्याच्या 47 तक्रारी दोन्ही तालुक्यांतून आल्या. याची पडताळणी करून आर्णी येथील लक्ष्मण लखमोड, तर दारव्हा येथे नीलेश भोयर यांनी संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
 
 
त्यावरून कंपनीचा मालक विजयसिंग कुशवाह (शक्करखेडी, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. जिल्ह्यात आणखी सोयाबीन बियाणे कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. प्रयोगशाळेचा अहवाल येताच कृषी विभाग तक्रारी नोंदवीत आहे.
या कलमांनुसार कारवाई
 
 
या बियाणे कंपन्यांविरुद्ध 6 गुन्हे अधिनियम कलम 10 व 23 आणि कलम 318 (4) बीएनएसनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस ठाणे स्तरावरून होत आहे. कंपन्यांनी शेतकèयांची फसवणूक करीत बोगस बियाणे माथी मारून मोठे आर्थिक नुकसान केले आहे.