अनिल कांबळे,
नागपूर
cement-roads high court शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या सिमेंट रोडचे बांधकाम आणि गुणवत्तेचे थर्ड पार्टी क्वाॅलिटी ऑडिट महापालिकेने केले आहे. ही बाब लक्षात घेत संबंधित ऑडिट अहवाल तपासण्याची परवानगी जनमंच संस्थेच्या वकिलांना न्यायालयाने शुक्रवारी दिली. तसेच, मनपा अधिकाऱ्यांनी याकरिता सहकार्य करावे, असे निर्देश दिले.
cement-roads high court या प्रकरणावर न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फलके व न्या. निवेदिता मेहता यांच्यापुढे सुनावणी झाली. खाजगी निष्पक्ष तज्ज्ञांमार्फत रस्त्यांच्या गुणवत्तेचे ऑडिट करण्याची मागणी 'जनमंच'च्या वतीने करण्यात आली होती. त्यासाठी अभियंते अमोल शिंगारे, अवरो चॅटर्जी, यशवंत खोरगडे व आर्किटेक्ट परमजितसिंग आहुजा या चार खाजगी तज्ज्ञांची नावे देण्यात आली होती. मात्र, महापालिकेने आधीच ऑडिट पूर्ण केल्याचे सांगितले. मनपाचा खाजगी ऑडिटला विरोध आहे.
cement-roads high court सार्वजनिक कामांच्या ऑडिटसाठी राज्य शासनाने २८ मार्च २०१८ च्या निर्णयाद्वारे वैधानिक आणि प्रशासकीय यंत्रणा ठरवून दिली आहे. त्यानुसार, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि मान्यताप्राप्त संस्थांमार्फतच हे ऑडिट केले जाते, असे मनपाचे म्हणणे आहे. या प्रकरणावर आता २७ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.