सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा

-पसंतीक्रम भरतानाच ’मागील वर्षाचे कट-ऑफ मार्क्स’दिसणार

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
नागपूर
cet students अभियांत्रिकी, औषधनिर्माण, कृषी, व्यवस्थापनासह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कॅपद्वारे प्रवेश घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी यंदा मोठी सवलत आहे. सीईटी कक्षाने यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत एक नवी सुविधा सुरू केली आहे. आता पसंतीक्रम भरतानाच प्रत्येक महाविद्यालय आणि शाखेचे मागील वर्षाचे पात्रता गुण विद्यार्थ्यांना स्क्रिनवर दिसणार आहेत.
 

cet students 
अंदाजाने भरलेले पसंतीक्रम आता बंद
आतापर्यंत विद्यार्थ्यांना कट-ऑफ मार्क्स शोधण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईटवर धावपळ करावी लागत होती. अनेकदा अपुरी किंवा चुकीची माहिती मिळाल्याने अवास्तव पसंतीक्रम भरले जात होते. त्यामुळे चांगले गुण असूनही अपेक्षित कॉलेज हातून जात होते. ही अडचण ओळखून सीईटी कक्षाने थेट प्रवेश पोर्टलमध्येच ही सुविधा जोडली आहे.
 
 
नवी सुविधा कशी काम करणार?
विद्यार्थी जेव्हा पसंतीक्रमाची यादी तयार करेल...
तेव्हा महाविद्यालय/शाखेचे नाव निवडताच त्याच्या बाजूलाच मागील वर्षाचे पात्रता गुण दिसतील.
त्यामुळे ‘माझे गुण अन मागील वर्षाचा कट-ऑफ‘ याची तुलना तात्काळ होईल.
त्यानुसार विद्यार्थी वास्तववादी आणि संतुलित पसंतीक्रम भरू शकतील.
 
 
गोंधळ टळणार, प्रवेशाची शक्यता वाढणार
विद्यार्थ्यांनी स्वतःचे गुण आणि मागील वर्षाचा कट-ऑफ पाहूनच पसंतीक्रम निश्चित करावा. त्यामुळे अनावश्यक धावपळ आणि गोंधळ कमी होईल. प्रवेश मिळण्याची शक्यता वाढेल.
 
 
लाखो विद्यार्थ्यांना फायदा
अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, एमबीए/एमएमएस या सर्व कॅप अभ्यासक्रमांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी ही सुविधा सुरळीत चालावी यासाठी वारंवार चाचणी घेण्यात येत असल्याचेही सीईटीकडून स्पष्ट करण्यात आले.
 
आधी काय होते, यंदा काय बदल
कट-ऑफसाठी वेगळी शोधाशोध ,पसंतीक्रमातच कट-ऑफ दिसणार
अंदाजावर पसंतीक्रम गुणांची तुलना करून पसंतीक्रम
चुकीच्या पर्यायामुळे प्रवेश हुकणे वास्तववादी पर्याय, प्रवेशाची शक्यता जास्त