वर्धा,
customers-defrauded : समतानगर येथील वर्धा मर्चंट नागरी सहकारी पत संस्थेचा अध्यक्ष भीमराव उर्फ भीमा शंभरकर याने अधिक व्याजाचे आमिष देऊन ग्राहकांची तब्बल ४ कोटी ५० लाख ५८ हजार ७६६ रुपयांनी फसवणूक केली आहे. ज्या ग्राहकांची या पतसंस्थेने फसवणूक केली आहे. त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा येथे गुंतवणूक संदर्भातील कागदपत्रे सादर करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
शंभरकर याने ग्राहकांना आर. डी., एफडीवर तब्बल १३ टक्केचे आमिष दिले होते. यामुळे समतानगर, सेवाग्राम व वर्धा शहर परिसरातील ग्राहकांनी या पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. मुदत संपल्यावर देखील पतसंस्थेने ग्राहकांची पैसे परत दिले नाही. तब्बल ४ कोटी ५० लाख ५८ हजार ७६६ रुपयांची फसवणूक केली. पतसंस्थेच्या अध्यक्षावर वर्धा शहर ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या पतसंस्थेत ज्या नागरिकांनी रक्कम गुंतवणूक केली आहे. आजपर्यंत परतफेडीचे फार्म भरून दिले नाही, अशा सर्व नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखा येथे गुंतवणूक रक्कमेसंबधी पुरावे कागदपत्रांसह सादर करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.