वर्धा,
cyber-fraud : भारतात विविध ठिकाणी सायबर फसवणूक करीत ४६ लाख ५० हजार रुपयांची रक्कम आरोपींच्या मदतीने विविध खात्यांमध्ये पाठविल्याची घटना म्हसाळा येथे उघडकीस आली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी दानिश रहेमान सय्यद रा. म्हसाळा याच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
दानिश रहेमान सय्यद याने त्याचे नावाने बँक ऑफ बडोदा येथे म्युल खाते काढले. यानंतर त्याने भारतात विविध ठिकाणी सायबर फसवणूक केली. फसवणुकीचे ४६ लाख ५० हजार ५ रुपये त्याच्या खात्यात पाठविले. यानंतर हीच रक्कम इतर आरोपींच्या मदतीने वेगेवगेळ्या खात्यामध्ये हस्तांंतरीत केली. म्युल खातेधारकांच्या चौकशी दरम्यान ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी दानिश रहेमान सय्यद याच्या विरुद्ध गुुन्हा नोंद केला आहे.