दिग्रस भाजपाच्या आरोग्य व रक्तदान शिबिराला प्रतिसाद

700 रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दिग्रस, 
health-blood-donation-camp : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिना निमित्त ‘सेवा दिन’ साजरा करताना स्थानिक ग्रामीण रुग्णालय येथे भाजपाकडून गुरुवार, 23 जुलैला भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपाचे पुसद जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गजानन निचत, शहराध्यक्ष अभय इंगळे व तालुकाध्यक्ष अरुण राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रोगनिदान शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जवळपास 700 रुग्णांनी तपासणी करुन त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले.
 
 
 
y24July-Aarogya
 
 
 
शिबिराला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विरेंद्र अस्वार, नगर परिषद अध्यक्ष पंचशिला इंगोले, भाजपाच्या जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, जिल्हा महामंत्री प्रा. दत्तात्रय राहणे, सुधीर देशमुख, डॉ. प्रशांत रोखडे, डॉ. संदीप दुधे, ठाणेदार वैद्यनाथ मुंडे तथा शहरातील अनेक मंडळींनी भेट दिली.
 
 
शिबीरासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष अरुण राठोड, रमेश करवा, मनोज राठोड, अनिल भरारे, संतोष मांजरखेडे, जागृती मेहता, म. आतिक म. इस्राईल, तुफान काशीकर, संजय घरत, सदानंद जाधव, स्वप्नील राठोड, विष्णू राठोड, अमित शहा, मुज्जु गारवे, प्रमोद बनगीनवार, सुभाष काटेकर, वाजीद शेख व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आरोग्यधाम ब्लड स्टोरेज रक्तपेढीकडून रक्त पिशवी संग्रहित करण्यात आली.