वडिलांकडून मुलीवर अत्याचार

आईच्या तक्रारीवरून अटक

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
वर्धा,
father-sexually-assaults-daughter : समुद्रपूर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. ४२ वर्षीय नराधम पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर जवळपास महिनाभरापासून लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणाची तक्रार आईने पोलिसांकडे करताच नराधम वडिलाला अटक करण्यात आली.
 

k 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, अवैध दारू विक्रीप्रकरणी मुलीच्या आईला एक महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले होते. या दरम्यान, घरी एकटी राहणार्या तिच्या मुलीवर वडिलांनीच वारंवार लैंगिक अत्याचार केला. हद्दपारीचा कालावधी संपल्यानंतर आई समुद्रपुरात परतल्यावर मुलीने ही घटना सांगितली. हा गंभीर प्रकार ऐकून मुलीच्या आईने समुद्रपूर पोलिस ठाणे गाठून पतीविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने आरोपी वडिलाला अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास समुद्रपूर पोलिस करीत आहेत.