शासकीय योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करा : संतोष धोत्रे

आढावा बैठकीत दिले निर्देश

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
बाभूळगाव, 
santosh-dhotre : शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी आढावा बैठकीदरम्यान दिले. पंचायत समितीतंर्गत येणाèया सर्व विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक आनंद पिंगळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सारंग आगरकर, जिल्हा व्यवस्थापक, पंचायत समितीचे सर्व खातेप्रमुख, ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 

y24July-Dhotre 
 
बैठकीत राबविण्यात येणाèया शासकीय योजनांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. ग्रामविकास, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), प्रधानमंत्री जनमन योजना, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, समाजकल्याण, पाणीपुरवठा, बांधकाम, ग्रामपंचायत प्रशासन तसेच इतर सर्व विभागांच्या कामकाजाची समीक्षा करून प्रलंबित कामे वेळेतपूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
 
 
सीईओ संतोष धोत्रे यांनी मनरेगा अंतर्गत मंजूर सर्व कामे तातडीने सुरू करणे, लाभार्थ्यांचे ई-केवायसी व आधार अद्ययावत प्रक्रियापूर्ण करणे, प्रलंबित देयके त्वरित अदा करणे, मस्टर वेळेवर काढणे, श्रमिकांना नियमित रोजगार उपलब्ध करून देणे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील अपूर्ण घरे व प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत 2025-26 पर्यंतची सर्व प्रलंबित प्रकरणे निर्धारित कालावधीतपूर्ण करण्याचे निर्देश दिले.
 
 
यावेळी उमेद राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत महिला बचत गटांच्या कामाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. संतोष धोत्रे यांनी महिला बचत गटांना केवळ बचतीपुरते मर्यादित न ठेवता उत्पादन, प्रक्रिया उद्योग, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन, सूक्ष्म उद्योग आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून स्वावलंबी करण्यासाठी सूचना दिल्या.
 
 
शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला मिळावा, बचत गटांचे उत्पन्न वाढावे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम व्हावी, यासाठी उमेद अभियानाने अधिक परिणामकारकपणे कार्य करण्याचे निर्देश त्यांनी दिले.