तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
priyadarshini-uike : वंजारीफैल परिसरातील खराब रस्त्याची नगर परिषद अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके यांनी फुटलेल्या व अत्यंत खराब झालेल्या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना दररोज ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामाना करावा लागत असून, पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत आहे.
यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच संबंधित अधिकाèयांना या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व सुकर रस्ते उपलब्ध करून देणे ही आमची बांधीलकी असून, या कामाचा सातत्याने पाठपुरावा करुन लवकरच लवकर रस्त्याची दुरुस्ती पूर्ण करण्यात येईल, असे यावेळी नप अध्यक्ष अॅड. प्रियदर्शिनी उईके सांगितले.
आम्ही सदैव कटिबद्ध
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
अॅड. प्रियदर्शनी उईके
यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष