पाकिस्तान नाही तर थेट इराण-हाँगकाँग कनेक्शन!

-CJPच्या आंदोलनात वापरले ’हे’ सिक्रेट तंत्रज्ञान -पोलिसांनाही दिला चकमा

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली
cjp-movement : दिल्लीतील सीजेपी (कॉकरोच जनता पार्टी) समर्थकांच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी परस्परांतील संवाद लपवण्यासाठी एका नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. या तंत्रज्ञानामुळे दिल्ली पोलिसांना आंदोलकांमध्ये नेमका काय संवाद सुरू आहे, किती लोक एकत्र येणार आहेत किंवा आंदोलनाची आखणी कशी केली जात आहे, याचा अंदाज बांधणे कठीण झाले.
 
 
 
CJP
 
 
यापूर्वी इराण, हाँगकाँग आणि म्यानमारमधील मोठ्या आंदोलनांमध्येही अशाच प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर झाल्याचे अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. या पद्धतीत परस्पर संवाद साधण्यासाठी सिम कार्ड किंवा इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नसते.
 
कोणते तंत्रज्ञान वापरले गेले?
 
 
जंतर-मंतर आणि परिसरातील आंदोलनात वापरण्यात आलेल्या या तंत्रज्ञानाला ‘फोसम’ ( फॉरवर्ड सिक्रेट मॅसेजिंग इन अ‍ॅड हॉक नेटवर्क) किंवा मेश मेसेजिंग नेटवर्क असे म्हटले जाते. या पद्धतीत ब्लूटूथच्या माध्यमातून संदेश एका मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलपर्यंत पोहोचवले जातात. यासाठी इळींलहरीं आणि इीळरी यांसारखी ॲप्स वापरली जातात.
 
या अ‍ॅप्सची वैशिष्ट्ये
 
 
लॉगिनसाठी मोबाईल क्रमांकाची गरज नसते.
 
ई-मेल आयडीची आवश्यकता नसते.
 
सिम कार्डशिवायही वापर करता येतो.
 
इंटरनेटशिवाय संदेश पाठवता येतात.
 
 
संदेश थेट एका मोबाईलवरून दुसèया मोबाईलकडे जात असल्यामुळे त्याचा कोणताही डिजिटल रेकॉर्ड तयार होत नाही.
दिल्लीतील आंदोलनात नेमकी हीच अ‍ॅप्स वापरली गेली होती की त्याच स्वरूपातील इतर अ‍ॅप्स वापरण्यात आली होती, याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. मात्र पोलिसांच्या हाती लागलेल्या प्राथमिक पुराव्यांमध्ये मेश नेटवर्कचा वापर झाल्याचे संकेत मिळाल्याचे सांगितले जात आहे.
 
पोलिसांना संदेश ट्रॅक का करता येत नाहीत?
 
 
सामान्य परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्यास पोलिस दूरसंचार कंपन्या आणि इंटरनेट सेवा पुरवठादारांकडून माहिती घेऊन मोबाईल नेटवर्कवरील काही संवादांचा तपास करू शकतात. मात्र मेश नेटवर्क अ‍ॅप्स मोबाईल नेटवर्क किंवा इंटरनेटचा वापरच करत नाहीत. ही ॲप्स ब्लूटूथ-टू-ब्लूटूथ कनेक्शनवर काम करतात. त्यामुळे दूरसंचार कंपन्यांकडे त्यांची नोंद उपलब्ध नसते.