नीट परीक्षेत प्रथम आलेल्या जानव्हीचा डॉ. होळी यांच्या हस्ते सत्कार

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
चामोर्शी, 
janhvi-jampalwar : नीट परीक्षेत 700 पैकी 609 गुण प्राप्त करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणार्‍या जानव्ही नरेश जम्पलवार हिचा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी तिच्या निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला.
 
 
j
 
यावेळी डॉ. होळी यांनी जानव्हीचे विशेष अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सातत्यपूर्ण परिश्रम, कुटुंबीयांचे मार्गदर्शन आणि शिक्षकांचे सहकार्य यामुळेच हे यश संपादन करता आले असल्याचे त्यांनी सांगितले. जानव्हीने भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून समाजसेवा करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 
 
सत्कार कार्यक्रमाला सेवानिवृत्त मुख्याध्यापिका बिनाराणी होळी, साईनाथ बुरांडे, नरेश जम्पलवार, वर्षा जम्पलवार, जयराम चलाख, बीमल राय, बादल राय, बापू मंडल, अभिषेक हलदार, श्याम मिस्त्री, देवा गाईन, बिक्की मिस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.