चीन-पाकिस्तानचे धाबे दणाणले, भारताची ऐतिहासिक क्षेपणास्त्र चाचणी

आकाशात होणार शत्रूचा खात्मा

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली
kusha-air-missile : भारताने संरक्षण क्षेत्रात आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)ने ओडिशाच्या किनारपट्टीवरील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ‘कुशा’ या स्वदेशी विकसित लाँग रेंज सरफेस-टू-एअर मिसाइल सिस्टीमची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी पूर्ण केली आहे.
 
 

kusha 
 
 
 
'कुशा’ ही भारताच्या हवाई संरक्षण व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाची प्रणाली मानली जात असून ती भविष्यात देशातील सर्वात घातक हवाई संरक्षण शस्त्रांपैकी एक ठरणार आहे. हे क्षेपणास्त्र शत्रूची लढाऊ विमाने, ड्रोन आणि विविध प्रकारची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यास सक्षम आहे.
 
 
या यशस्वी चाचणीनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ऊठऊज चे अभिनंदन करत याला ‘संरक्षण संशोधन क्षेत्रातील एक ऐतिहासिक मैलाचा दगड‘ असे संबोधले.
 
शत्रूसाठी ‘कुशा’ का ठरणार घातक?
 
 
‘कुशा’ क्षेपणास्त्र प्रणालीची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिची लांब पल्ल्यावरील अचूक लक्ष्यभेदन क्षमता होय. ही प्रणाली हवाई शत्रूची लढाऊ विमाने, मानवरहित हवाई वाहने, विविध प्रकारची क्षेपणास्त्रे, दूरवर आणि मोठ्या उंचीवर उडणारी हवाई लक्ष्ये अशा धोक्यांचा प्रभावीपणे सामना करू शकते.
 
 
विशेष म्हणजे हे क्षेपणास्त्र उंच पर्वतीय भागांपासून ते सागरी किनारी आणि समुद्रातील क्षेत्रांपर्यंत प्रभावीपणे कार्य करू शकते. त्यामुळे विविध भौगोलिक परिस्थितींमध्येही भारतीय सैन्याला मजबूत हवाई संरक्षण मिळणार आहे.