आजपर्यंत अशी सुटसुटीत कर्जमाफी नाही

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची पत्रकार परिषदेत माहिती

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
वर्धा
pankaj bhoyar कर्ज व वीज बिल माफीमुळे शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर आला आहे. मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने घेतलेल्या निर्णयाने कर्ज आणि वीज माफीमुळे शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर आला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात सुटसुटीत कर्जमुक्ती झाली नाही, अशी माहिती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केलेल्या कर्ज माफी अभियानासंदर्भात २४ जुलै रोजी स्थानिक भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, आ. राजेश बकाने, माजी खासदार सुरेश वाघमारे, महामंत्री कमलाकर निंभोरकर, अशोक कलोडे यांची उपस्थिती होती.
 

no simple loan waiver happened till now says guardian minister pankaj bhoyar in wardha 
ना. डॉ. पंकज भोयर पुढे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना जवळपास ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. याशिवाय ४८ हजार कोटी रुपयांची जुनी वीज बिल थकबाकी माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. वर्धा जिल्ह्यातील ८९ हजार ६५१ शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा लाभ मिळाला आहे. तर राज्य शासनाने कर्ज मुक्ती करण्यासाठी नोकरदार, लोकप्रतिनिधी नसण्याची अट असल्याने त्याची शहानिशा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील किती शेतकर्यांना कर्जमुक्तीचा फायदा झाला हे स्पष्ट होईल, असे ना. डॉ. भोयर यांनी सांगितले. या कर्जमुक्तीचा शे