अंकीसा येथे 1000 चंदन रोपांची लागवड

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
गडचिरोली, 
planting-of-sandalwood-saplings : जिल्ह्यात वाढती वृक्षतोड व खाणकाम (माइनिंग) यामुळे पर्यावरणावर होत असलेल्या परिणामांच्या पृष्ठभूमीवर ‘हरित गडचिरोली’ या संकल्पनेला चालना देण्यासाठी माई वेलफेयर फाऊंडेशनच्या वतीने सिरोचा तालुक्यातील अंकीसा येथील मुक्केरा परिवार यांच्या शेतजमिनीमध्ये 1000 चंदन रोपांची लागवड करण्यात आली.
 
 
planting-of-sandalwood-saplings
 
 
 
या उपक्रमाला माई वेलफेयर फाऊंडेशनचे संचालक डॉ. स्वामी अलोणे यांच्या 32 वर्षांच्या वनशेतीतील अनुभवाचे तसेच राजरत्न अलोणे यांच्या 9 वर्षांच्या चंदन शेतीतील अनुभवाचे मार्गदर्शन लाभले. चंदन लागवडीद्वारे पर्यावरण संवर्धनाबरोबरच शेतकर्‍यांना दीर्घकालीन आर्थिक लाभ मिळवून देण्याचा उद्देश आहे.
 
 
योग्य नियोजन आणि संगोपन केल्यास 12 ते 15 वर्षांनंतर चंदनाच्या लागवडीमधून शेतकर्‍यांना एक चंदन झाड लाखों रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, असा विश्‍वास मार्गदर्शकांनी व्यक्त केला. त्यामुळे पर्यावरण संरक्षणासोबतच ग्रामीण भागातील शेतकर्‍यांसाठी हा उपक्रम उत्पन्नवाढीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो. लागवड करण्यात आलेल्या चंदन रोपांच्या संगोपन व सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी मुक्केरा परिवाराने स्वीकारली असून, प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण करून ‘हरित गडचिरोली-समृद्ध गडचिरोली’ घडविण्यास हातभार लावावा, असे आवाहन माई वेलफेयर फाऊंडेशनने केले आहे.