मुंबई
preetam and pedro serie आजच्या डिजिटल युगात मुलांचा ऑनलाइन जगाशी वाढता संपर्क हा पालक आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचा विषय बनला आहे. मुले दररोज सरासरी चार तास ऑनलाइन घालवत असल्याने डिजिटल सुरक्षितता ही केवळ घरापुरती मर्यादित चिंता न राहता देशासमोरील एक गंभीर मुद्दा बनली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकुमार हिरानी फिल्म्स निर्मित आणि जिओहॉटस्टारवर प्रदर्शित होणारी समीक्षकांची प्रशंसा मिळालेली ‘प्रीतम अँड पेड्रो’ ही मालिका देशभरातील हजारो शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी व्यापक अभियान राबवत आहे.
अभ्यासानुसार, भारतातील सुमारे 33 टक्के नागरिकांना सायबर बुलिंग किंवा ऑनलाइन शोषणाच्या काही ना काही प्रकाराला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर ‘प्रीतम अँड पेड्रो’ ही मालिका सायबर गुन्हे, डिजिटल गोपनीयता आणि जबाबदार ऑनलाइन वर्तन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर प्रभावीपणे भाष्य करते.
मुलांना सहज समजेल अशा रंजक कथानकाच्या माध्यमातून ही मालिका ऑनलाइन सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देते. डिजिटल सुरक्षेच्या मुद्द्यांसोबतच सहानुभूती, मानसिक खंबीरपणा, डिजिटल जगातील सकारात्मक वर्तन आणि ऑनलाइन छळाविरोधात ठामपणे उभे राहण्याची प्रेरणा देण्याचे काम ही मालिका करते.
मालिकेचा संदेश थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी देशभरात व्यापक संयुक्त शैक्षणिक अभियान राबवण्यात येत आहे. भारतातील आघाडीचे शैक्षणिक व्यासपीठ EducationWorld आणि DAV United या संस्थांनी एकत्र येत हा उपक्रम अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे.
या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत शाळांमध्ये मालिकेचे विशेष प्रदर्शन, मार्गदर्शित वर्गचर्चा तसेच पालक आणि शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘प्रीतम अँड पेड्रो’ ही मालिका केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणारे प्रभावी शैक्षणिक साधन ठरत आहे.
कथाकथनाच्या प्रभावी माध्यमाचा वापर करून हा संयुक्त उपक्रम तंत्रज्ञानाबाबतची भीती कमी करण्याचा आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित, जबाबदार व जागरूक डिजिटल नागरिक बनवण्याचा प्रयत्न करत आहे.