पं. अग्निहोत्री पद्मश्रीचे दावेदार : तडस

नारी शक्ती व विद्यार्थी पुरस्कार वितरण

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
ramdas-tadas : पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी पन्नास वर्षांत अनेक सामाजिक कार्य केले असून त्यांनी राजकीय क्षेत्राला तिलांजली देऊन सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राला समाज सेवेचे माध्यम बनवले. त्यांचे सामाजिक कार्य व शैक्षणिक कार्य मोठे असल्याने पद्मश्री पुरस्काराचे ते खरे मानकरी आहेत. त्यांना पद्मश्री मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस यांनी दिले.
 
 
jlk
 
स्थानिक शिवशंकर सभागृहात मातोश्री स्व. राणीबाई अग्निहोत्री स्मृती दिनानिमित्त गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार तसेच नारी भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून आ. राजेश बकाने, अप्पर, जिल्हाधिकारी शोभिका पाठक, तहसीलदार बबिता आळंदे, संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री होते.
 
 
आ. राजेश बकाने म्हणाले की, पं. अग्निहोत्री यांनी महाकाली येथे तयार केलेला प्रायोजित विकास आराखडा मंजूर करून घेण्यापासून तर ते पूर्णत्वात नेण्यापर्यंत आम्ही चारही आमदार शासनाकडे पाठपुरावा करू असे ते म्हणाले.
अतिरिक्त जिल्हाधिकारी शोभिका पाठक यांनी नारी शक्ती आता प्रत्येक क्षेत्रात पोहोचली असून अत्यंत कुशलतेने आपले कार्य करून देशाचा नाव लौकिक उंचावत आहे. पं. अग्निहोत्री यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याकरिता आपण कटिबद्ध असून सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
 
पं. अग्निहोत्री यांनी नारी पूज्यनीय आहे कारण ती घराची माया, समाजाची शक्ती आणि संस्कारांची धुरी असते. ती प्रेमाने, धैर्याने आणि ध्येयाने कुटुंब व समाज घडवते. नारीच्या योगदानाला सन्मान देणे आणि तिच्या हक्कांचे रक्षण करणे हा प्रत्येकाचा कर्तव्य आहे. कोणतेही कार्य हे सहज सरल व सुलभ असावे म्हणजे ते परिणाम कारक असते असे ते म्हणाले.
 
 
यावेळी डॉ. प्रवीणा जैन यांना नारी आरोग्य भूषण पुरस्कार, पल्लवी पुरोहित यांना आध्यात्मिक निवेदिका कला भूषण पुरस्कार, सुरभी ढोमणे यांना गीत संगीत जगत भूषण पुरस्कार, भारती कदम यांना संगीत गीत गायन नारी भूषण पुरस्कार, स्वरा अष्टपुत्रे यांना उत्तम शिक्षिका नारी भूषण पुरस्कार, सानिया बोपटे यांना गीत गायन संगीत कला भूषण पुरस्कार, शैलजा साळुंके यांना समाज भूषण नारी रत्न पुरस्कार, मुमताज अजमत खान यांना समाज भूषण नारी रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संचालन प्राचार्य डॉ. चंद्रकांत कोठारे, सन्मानपत्राचे वाचन आकांक्षा त्रिपाठी यांनी तर आभार पल्लवी पुरोहित यांनी मानले.