लक्ष द्यां..देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक बदल

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
पुणे
pune traffic कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) २० जुलै रोजी जंतरमंतर ते संसद असा मोर्चा पुकारला होता. या मोर्चासाठी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले होते. त्यानंतर आता सीजेपीने २४ जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांनी शांततापूर्ण मार्गाने सहभागी व्हावे, असे आवाहन सीजेपीकडून करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत काही तात्पुरते बदल करण्यात आले असून, नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करताना पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.
 

pune traffic diversion today due to cjp protest alternative routes announced 
यासंदर्भात पुणे शहर वाहतूक पोलिसांनी एक्सवर अधिकृत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आज नियोजित मोर्चा आणि आंदोलनाच्या अनुषंगाने शहरातील काही प्रमुख मार्गांवर तात्पुरते वाहतूक बदल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करताना पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असेही पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
मोर्चाची सुरुवात लाल महाल येथून होणार असून त्यानंतर फडके हौद, दारुवाला पूल, नरपतीगिरी चौक, बेलाई माता मंदिर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर गणेश रोडवरील वाहतूक लक्ष्मी रोडकडे वळविण्यात येणार आहे. केळकर रोडऐवजी सूर्या हॉस्पिटल–१५ ऑगस्ट चौक मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाजी रोडवरील वाहतुकीसाठी एबीसी–फुटका बुरुज हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच नेहरू रोडवरील वाहतूक जंगली महाराज रोड, नदीपात्र मार्ग किंवा टिळक रोड–बॅनर्जी चौक–नेहरू मेमोरियल या पर्यायी मार्गांवरून वळविण्यात येणार आहे.वाहतूक पोलिसांनी नागरिकांना प्रभावित मार्ग टाळून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले असून वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, वाहतूक बदलांबाबतची ही अधिकृत पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.