समालखात राष्ट्र सेविका समितीची बैठक सुरू
दिनांक :24-Jul-2026
Total Views |
समालखा (पानिपत)
rashtra sevika samiti विकसित भारताच्या दिशेने प्रगती करण्यासाठी भारताकडे आवश्यक संसाधने आणि संपत्ती आहे. आपण ही शक्ती ओळखली पाहिजे आणि राष्ट्रदेवतेच्या चरणी ती समर्पित करण्याची भावना जागृत केली पाहिजे, असे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख कार्यवाहिका सीता गायत्री यांनी व्यक्त केले. राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी मंडळाच्या पहिल्या द्विवार्षिक बैठकीला हरयाणातील समालखा येथे सुरुवात झाली. त्यावेळी सीताक्का बोलत होत्या. माधव स्मृती संकुलात आयोजित या तीन दिवसीय बैठकीच्या उद्घाटनाला समितीच्या प्रमुख संचालिका शांताकुमारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
rashtra sevika samiti राष्ट्र सेेविका समितीच्या आद्य संचालक लक्ष्मीबाई उपाख्य मावशी केळकर यांच्या जयंतीनिमित्त, म्हणजेच संकल्प दिवशी, समितीच्या कार्याद्वारे गेल्या ९० वर्षांपासून सुरू असलेले स्त्रीशक्ती जागृतीचे कार्य अविरतपणे सुरू ठेवण्याची आपण प्रतिज्ञा केली पाहिजे. इराणला वैद्यकीय मदत घेऊन जाणारे भारतीय विमान हे ‘वसुधैव कुटुंबकम’चे जिवंत उदाहरण आहे. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमधील सुवर्णपदक आणि आयसीसी महिला टी-२० विश्वचषकातील भारताचा प्रभावी विजय हे विविध क्षेत्रांमध्ये भारताचा वाढता प्रभाव दर्शवतात, असे सीताक्का यांनी नमूद केले. दीपप्रज्वलनानंतर, राष्ट्रीय सेविका समितीच्या माजी अखिल भारतीय सहकारी दिवंगत रुक्मिणी अक्का आणि रेखाताई राजे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुमन कल्याणपूर आणि एस. जानकी यांच्यासह इतर प्रतिष्ठित नागरिक, तसेच दहशतवादी हल्ल्यांमध्ये हुतात्मा झालेले जवान आणि अपघात व नैसर्गिक आपत्तींमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.
rashtra sevika samiti या बैठकीत ३८ प्रांतांमधून सुमारे ५०० प्रतिनिधी स्वयंसेविका सहभागी होत आहेत. उद्घाटन सत्रात, प्रमुख कार्यवाहिका सीता गायत्री यांनी समितीच्या कार्याचा आणि शिक्षण वर्गांचा आढावा घेतला. समितीच्या शाखांची संख्या, सभा केंद्रे, शाखा जिल्हे आणि सेवाकार्यात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. देशभरात २,८६६ ठिकाणी समितीची सेवाकार्ये सुरू असून शिक्षण, संस्कृती, आत्मनिर्भरता आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये विविध प्रकल्पांच्या स्वरूपात कार्य केले जाते. समितीच्या माध्यमातून योग केंद्रेही चालवली जातात. चालू वर्षात देशभरातील विविध ठिकाणी २५० वर्ग आयोजित करण्यात आले असू्न १५,२४१ स्वयंसेविकांना प्रशिक्षण देण्यात आले. पश्चिम बंगाल, जम्मू आणि छत्तीसगडमधील समिती कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. जागतिक महिला दिनानिमित्त, आयोजित 'नारी से नारायणी' परिषदेचाही त्यांनी उल्लेख केला. समितीच्या या बैठकीत विविध स्तरांवरील अधिकारी उपस्थित असून, बैठकीचा समारोप २६ जुलै रोजी होईल.