सेलू येथील घरफोडीचा पर्दाफाश : तिघांना अटक

    दिनांक :24-Jul-2026
Total Views |
सेलू, 
selu-burglary-case : शहरातील एका घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने तीन सराईतांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ७ लाख ९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील एक जण फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ रोजी शहरातील जयस्वाल लेआऊट रहिवासी राहुल फटिंग यांनी घरफोडीची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
 

k 
 
गोपनीय माहितीच्या आधारे मोहम्मद जाकीर मोहम्मद शाहिद अन्सारी रा. नागपूर, सानू उर्फ मोहम्मद शाहिद मोहम्मद रशीद रा. नागपूर आणि फैजान युनूस खान रा. हिंगणघाट यांना अटक करण्यात आली. चौथा आरोपी शेख आफताब शेख अब्दुल्ला उर्फ गोलू हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार, चोरीतील मुद्देमाल असा ७ लाख ९ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. मुख्य आरोपी मोहम्मद जाकीर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध ३६ गंभीर गुन्हे नोंद असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.