नागपूर ,
Sevasadan High School सेवासदन हायस्कूलमध्ये आषाढी पौर्णिमेनिमित्त वारकरी संप्रदायाची परंपरा जपत भव्य वारकरी दिंडी काढण्यात आली. "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "पांडुरंग हरी"च्या जयघोषाने तसेच टाळ-मृदंग, लेझीम व अभंग-भजनांनी संपूर्ण विद्यालय परिसर भक्तिमय झाला.कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन संस्थेच्या सचिव श्रीमती वासंती भागवत, डॉ. कल्पना तिवारी आणि प्राचार्य डॉ. अजय चव्हाण यांच्या हस्ते झाली.
दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तुळशीवृंदावन, भगवे ध्वज, टाळ-मृदंग, लेझीम आणि बँड पथकामुळे दिंडीला पारंपरिक स्वरूप लाभले. विद्यार्थ्यांनी अभंग व भजन सादर करत वारकरी परंपरेचा अनुभव घेतला.यावेळी वासंती भागवत व डॉ. कल्पना तिवारी यांनी वारकरी संप्रदाय समता, बंधुता, सेवा आणि संस्कारांची परंपरा असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी संतांचे विचार आचरणात आणावेत, असे आवाहन केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. गीरडे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने दिंडी उत्साहात पार पडली.
सौजन्य:बाळकृष्ण सुरतने,संपर्क मित्र