वॉशिंग्टन,
the heart too has a little brain हृदयातील एक सूक्ष्म चेतासंस्था तणावाखाली असतानाही हृदयाचे ठोके सामान्य ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हृदयातील वेगवेगळ्या चेतापेशी वेगवेगळी कार्ये करतात, असे येल विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या एका अभ्यासात उघड झाले आहे.. हा शोध भविष्यात हृदयरोगावर अधिक अचूक आणि प्रभावी उपचार विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.हृदय मेंदूच्या आदेशांना प्रतिसाद देते, यासोबतच त्याची स्वतःची सूक्ष्म चेतासंस्था देखील हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

हृदयातील काही विशिष्ट चेतापेशी तणावाखाली असतानाही हृदयाचे कार्य सामान्य ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, असे उंदरांवर केलेल्या एका नवीन अभ्यासात, शास्त्रज्ञांना आढळले आहे. हा शोध भविष्यात हृदयरोगावर अधिक अचूक आणि प्रभावी उपचार विकसित करण्याचा मार्ग मोकळा करू शकतो. ‘सेल' या नियतकालिकेमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात अभ्यासात, येल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या शास्त्रज्ञांनी हृदयातील अंतर्गत चेतासंस्थेचा सविस्तर अभ्यास केला. संशोधकांच्या मते, आतापर्यंत हृदयातील बहुतेक चेतापेशी मोठ्या प्रमाणात एकसारख्याच असतात, असे मानले जात होते. परंतु नवीन संशोधनातून या पेशींचे वेगवेगळे प्रकार भिन्न कार्ये करतात, हे दिसून आले.
शास्त्रज्ञांच्या मते, ज्याप्रमाणे पचनसंस्थेतील गुंतागुंतीच्या चेताजालाला शरीराचा ‘दुसरा मेंदू’ म्हटले जाते, त्याचप्रमाणे हृदयाचीही एक स्वतंत्र चेतासंस्था असते. हे जाळे हृदयाभोवतीच्या मेदयुक्त उतींमध्ये पसरलेले असते. यातील चेतापेशी केवळ मेंदूकडून संकेतच घेत नाहीत, तर त्या आपापसात संदेशांची देवाणघेवाणही करतात आणि अंतिमतः हृदयाचे ठोके व त्याचे कार्य नियंत्रित करतात.
आतापर्यंत या चेतापेशींना समजून घेणे होते कठीण
या चेतापेशी हृदयाच्या उतींमधील एकूण पेशींच्या केवळ ०.०१ टक्के असतात. यामुळेच त्यांची खरी कार्ये समजून घेणे शास्त्रज्ञांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी, संशोधकांनी जनुकीयदृष्ट्या सुधारित उंदरांचा वापर केला. ज्यामुळे हृदयातील सर्व चेतापेशींची स्पष्टपणे ओळख पटवणे शक्य झाले. यामुळे शास्त्रज्ञांना त्यांच्या वर्तनाचा आणि विशिष्ट भूमिकांचा तपशीलवार अभ्यास करता आला.